लिक झाल्या भारतातील आयफोनच्या किमती

iphone
मुंबई : भारतातील आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किमती उघड झाल्या असून ६० हजार रुपयांना आयफोन ६एस बेस मॉडेल तर ७२ हजारांपासून आयफोन ६एस प्लस उपलब्ध होईल.

१६ जीबीच्या आयफोन ६एस साठी ६२ हजार रुपये, ६४ जीबीच्या आयफोन ६एस साठी ७२ हजार रुपये, १२८ जीबीच्या आयफोन ६एस साठी ८२ हजार रुपये आणि १६ जीबीच्या आयफोन ६एस प्लससाठी ७२ हजार रुपये, ६४ जीबीच्या आयफोन ६एस प्लससाठी ८२ हजार रुपये, तर १२८ जीबीच्या आयफोन ६एस प्लससाठी ९२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड या चार रंगांमध्ये आयफोन ६एस आणि आयफोन ६एस प्लस उपलब्ध असतील. १६ ऑक्टोबरपासून भारतात आयफोनचा सेल सुरु होईल.

आयफोनच्या प्री-बुकिंगसाठी इन्फीबीमपाठोपाठ स्थानिक रिटेलर्सकडेही विचारणा होत आहे. १६ ऑक्टोबरलाच या ग्राहकांना फोन उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा मानस आहे. नवे आयफोन थ्रीडी फोर्स टच डिस्प्ले, १२ मेगापिक्सल आयसाईट कॅमेरा, iOS ९, ए९ चिपसेट, सेकंड जनरेशन फिंगरप्रिंट स्कॅनरसह यूझर्सच्या दिमतीला सज्ज आहेत. अॅपलचे हे दोन्ही फोन १६ जीबी, ३२जीबी आणि ६४ जीबी अशा तिन्ही वेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. फोन वाकू नये म्हणून ७००० सीरीज अॅल्युमिनियमचा वापर केला आहे. अॅपचा अॅक्सेस न करता वापरता येणारे “Get Directions” किंवा “Take Selfie” असे फीचर्सही आयफोनमध्ये आहेत.

Leave a Comment