मोटो एक्स स्टाईल लवकरच भारतात येणार

moto-x
मोटोरोलाने त्यांचा मिडरेंग फ्लॅगशीप मोटो एक्स स्टाईल भारतात लवकरच दाखल होत असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात तो नक्की कोणत्या तारखेला लाँच केला जाईल आणि त्याची भारतातील किंमत काय असेल याविषयी कांहीही माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हा फोन वनप्लस टू शी जोरदार स्पर्धा करेल असा जाणकारांचा अंदाज आहे. यापूर्वी हा फोन अनेक देशांत लाँच केला गेला आहे.

या स्मार्टफोनसाठी ५.७ इंची क्यूएचडी स्क्रीन,३ जीबी रॅम दिली गेली असून तो १६.३२ व ६४ जीबी मेमरीच्या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या तीनही व्हेरिएंटसाठी मायक्रोकार्डच्या सहाय्याने ही मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनसाठी २१ एमपीचा प्रायमरी तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. युनिव्हर्सल फोरजी सपोर्ट फोनसाठी आहे शिवाय टर्बो चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे हा फोन जगातील सर्वाधिक वेगाने चार्ज होणारा फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. अमेरिकेत १६ जीबी अनलॉक्ड व्हर्जनची किंमत ३९९ डॉलर्स म्हणजे २६ हजार रूपयांच्या दरम्यान आहे.

Leave a Comment