अबब ! घोड्याची किंमत साडेसात कोटी

ghoda
महागड्या गाड्या, आलिशान घरे यांच्या किमती कोट्यावधी रूपयांत ऐकण्यास आता सर्वसामान्यांचे कानही सरावले आहेत. पण एका घोड्यासाठीही साडेसात कोटी रूपये मोजणारे रईस आपल्या भारतात अगदी पुण्यातही आहेत. मुंबईत नुकताच ७५० कोटींचे लिंकन हाऊस खरेदी करणारे उद्योगपती सायरस पूनावाला यांनीच ही खरेदी केली आहे. या घोड्याचे नांव आहे अस्तबल. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हा घोडा पॅरिसमध्ये खरेदी केला असून पूनावाला यांचा स्टडफार्म जगात प्रसिद्ध आहे.

पूनावाला हे रेसचे शौकीन आहेत. दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये रेससाठी गेले असताना त्यांना अस्तबलने भुरळ घातली. त्यांनी हा घोडा विकत घेण्याचे ठरविले आणि त्यासाठी साडेसात कोटी रूपये किंमत मोजली. आता याच घोड्यावर पूनावाला रेसिंग सिझनमध्ये कोट्यावधी रूपये कमावतात. अर्थात अस्तबलची खातीरदारीही तशीच केली जाते. त्याच्या अंगावर घाणीचा एक शिंतोडा जरी उडला तरी त्याच्या स्वच्छतेसाठी १५ ते २० नोकर तैनात असतात. एखाद्या राजासारखी त्याची देखभाल केली जाते. अस्तबलचे एकूण सौष्ठव, त्याची लाईफ स्टाईल आकर्षक आहेच पण रेसमधली त्याची कामगिरीही सम्राटाला शोभेलशी आहे. पूनावाला यांनी रेससाठी स्वतत्र कंपनी स्थापन केली असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment