झुरिच – गेल्या ६० वर्षांत कोणताही हक्क न सांगितलेल्या भारतीय तसेच इतर देशांच्या नागरिकांच्या खात्यांची यादी स्वित्झर्लंड लवकरच जाहीर करणार आहे. डिसेंबरमध्ये जाहीर स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये असलेल्या अश्या खात्यांची सूची करण्यात येणार आहे.
जाहीर होणार दावा नसलेल्या स्विस खात्यांची यादी
अश्या खातेधारकांचा तपशील गेल्या अनेक वर्षांपासून स्वित्झर्लंडने गुप्त ठेवला आहे. मात्र, आता तेथील खात्यांचा तपशील जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्व स्वित्झर्लंडच्या बँकांकडून माहिती संकलित केल्यानंतर स्विस बॅंकिंग लोकपाल सर्व तपशिल जाहीर करणार आहे. तसेच त्या खात्यांच्या हक्कदारांना (लाभार्थी) हक्क सादर करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. १९५५ पासून ही खाती निष्क्रिय पडून आहेत. बँका खातेदारांशी संपर्क साधण्यास अयशस्वी ठरल्या आहेत.
स्विस बँकर्स असोसिएशन, स्वित्झर्लंडमधील हक्क न सांगितलेल्या खात्यांच्या तपशीलात खातेधारकाचे आडनाव, नाव, जन्म तारीख, राष्ट्रीयत्व व खातेदाराचा त्यावेळचा ज्ञात पत्त्याचा समावेश असणार आहे. परंतू डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार्या सूचीमध्ये खात्यातील संपत्ती, बॅंकेचे नाव जाहीर करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.