राष्ट्रीय महामार्ग उभारणींच्या कामावर ड्रोन व उपग्रहांची नजर

drone
रस्ते बांधकाम व विकास मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात विविध ठिकाणी सुरू होत असलेल्या राज्यीय, राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांवर ड्रोन व उपग्रहांमार्फत नजर ठेवण्याचा विचार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी इस्त्रोची मदत घेतली जाणार असून या कामी इस्त्रोसह सहकार्याबाबतचा समझोता लवकरच करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग हिरवेगार राखण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा कोट्यावधी झाडे लावण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली गेली आहे. झाडे लावणी व त्यांची देखभाल तसेच रस्तारूंदीकरणाची कामे, रस्ते दुरूस्तीची कामे वेळेवर आणि योग्य पद्धतीने व्हावीत यासाठी आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे तसेच या कामांवर चोख नजर ठेवण्यासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचाच वापर केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कामांवर आकाशातून ड्रोन आणि उपग्रहांमार्फत नजर ठेवली जाईल असे समजते.

Leave a Comment