डुप्लीकेट मालाचे नंदनवन समजल्या जाणार्या चीनमध्ये आता डुप्लीकेट माणसेही दिसू लागली आहेत. चित्रपटातून सर्रास एकमेकांसारखे दिसणारे हमशकल दाखविले जातात, अनेक चित्रपट तारे तारकांचे हमशकल असलेल्यांचे फोटोही प्रसिद्ध होतात. चीनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी लक्षणीय साम्य असलेला शी चोकुओ सध्या गाजत असून लवकरच तो मोठ्या पडद्यावरही दर्शन देणार आहे असे समजते.
चीनमध्ये डुप्लीकेट ओबामा
या दोघांच्या चेहरेपट्टीत खूपच साम्य असले तरी मुख्य फरक म्हणजे ओबामांनी पन्नाशी ओलांडली आहे तर शी फक्त २९ वर्षांचा आहे.मात्र तरीही त्याला पाहिल्यावर हे ओबामाच आहेत असा भास होतो. विशेष म्हणजे तो ओबामांसारखीच भाषणेही देतो फक्त इंग्रजीवर त्याचे फारसे प्रभुत्व नाही. त्यामुळे तो नक्की काय बोलतोय हे बरेच वेळा समजत नाही.शी गरीब घरात जन्मला आहे आणि १० वर्षे त्याने कारखान्यात मजुर आणि सुरक्षा रक्षक म्हणून कामही केले आहे. नशीबाने तो एका टॅलंट शो मध्ये आला आणि ओबामांशी असलेल्या साम्यामुळे पाहता पाहता लोकप्रियही झाला. इतका की त्याला पाहण्यासाठी आणि त्याचे भाषण ऐकण्यासाठी लोक तासनतास प्रतीक्षा करत आहेत.