उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी ग्रूप आणि जर्मन थिसनक्रूप एजी यांनी संयुक्त सहकार्यातून भारतासाठी १२ पाणबुड्या बनविण्याच्या प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले असून यासाठी किमान ५० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे जर्मन कंपनी थिसनक्रुप मधील अधिकार्यांकडून सांगितले गेले आहे. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत हा प्रकल्प करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मात्र त्यासाठी त्यांना लार्सन टुब्रो आणि माजगांव डॉक या कंपन्यांशीही स्पर्धा करावी लागणार आहे.
अनील अंबानी भारतासाठी बनविणार पाणबुड्या
थिसनक्रूप कंपनीचे बोर्ड सदस्य ऑलीव्हर बर्खार्ड यांनी मुंबईत अनील अंबानी यांची नुकतीच भेट घेतली असून या प्रकल्पाबाबतची चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले. हे कंत्राट त्यांच्या कंपनीला मिळेल असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले की सुरवातीला आम्ही ६ पाणबुड्यांच्या बांधणीसाठीचा प्रस्ताव ठेवणार आहोत. नंतर आणखी सहा पाणबुड्यांसाठीचा प्रस्ताव दिला जाईल. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागेल असेही ते म्हणाले.