९० ट्रेन आजपासून झाल्या ‘सुपरफास्ट’

indian-railway
नवी दिल्ली – लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या गाडयांचे आजपासून नवे वेळापत्रक लागू झाले असून या ९० ट्रेनचा वेग वाढवून त्यांना ‘सुपरफास्ट’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.

या गाड्‌यांनी प्रवासासाठी लागणारा वेळ १० मिनिटांपासून अडीच तासांपर्यंत कमी होणार आहे. दिल्ली -मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांचा वेळही या वेगवाढीमुळे वाचणार आहे. राजधानी, शताब्दी या गाड्या २० ते २५ मिनिटे लवकर पोहोचणार आहेत. दरम्यान, या ९० गाड्यांपैकी एक तृतियांश गाड्या गुजरातला जाणार्‍या किंवा गुजरातमार्गे पुढे जाणार्‍या आहेत.

Leave a Comment