सर्वाधिक सुरक्षित ब्लॅकफोन टू ची विक्री सुरू

blackphone
सुरक्षा हेच मुख्य ध्येय ठेवून बनविल्या गेलेल्या ब्लॅकफोन टू या स्मार्टफोनची विक्री उत्तर अमेरिकेत सुरू झाली असून त्याची किंमत आहे ७९९ डॉलर्स. सर्वात सुरक्षित म्हणून प्रसिद्धी मिळविलेला ब्लॅकफोन सर्वप्रथम सायलेंट सर्कल नावाच्या कंपनीने २०१५ मध्ये मोबाईल वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये सादर केला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा अतिसुरक्षित समजला जाणारा ब्लॅकबेरी स्मार्टफोन वापरतात. त्याच धर्तीवर ब्लॅकफोन टूसाठीही खास ऑपरेटिंग सिस्टम आहे. प्रायव्हेट ओएस नावाने ओळखली जाणार्‍या या सिस्टमच्या मदतीने एन्क्रिप्टेड टेक्स्ट मेसेज अथवा कॉल करता येतात. यात साठविलेल्या फाईल्सही अतिशय सुरक्षित असतात. त्याचे वेबब्राऊसिंगही खास कनेक्शनच्या सहाय्यानेच करता येते.त्यासाठी वेगवेगळे लॉग इन आयडी डिव्हायसेस मध्ये वेगवेगळ्या भागात सेव्ह केलेले असतात. त्यामुळे या फोनचे ट्रसिंसिग करणे अवघड बनते.

या फोनसाठी ५.५ इंचाचा फुल एचडी स्क्रीन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास थ्री प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ३ जीबी रॅम व फोरजी, एलटीई कनेक्शनला तो सपोर्ट करतो.अन्य फिचर्स अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. हा फोन भारतात कधी दाखल होईल या संदर्भातली माहितीही दिली गेलेली नाही.

Leave a Comment