मोटारींना बंदी असलेला अजब हायवे

highway
अमेरिकेच्या मिशिगन स्टेट मधील एक हायवे हा सर्वाधिक सुरक्षित समजला जातो कारण एम १८५ नावाच्या या हायवेवर मोटारींना मुळी बंदीच आहे. जगात हा एकमेव असा हायवे आहे जेथे गाड्यांनाच बंदी आहे.

असे समजते की या रस्त्यावर १८९८ सालापासूनच कारना बंदी घातली गेली आहे. त्यामागचे कारणही विचित्र आहे. एका डॉक्टरच्या कारच्या आवाजामुळे घोडे घाबरल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली व तेव्हापासून या रस्त्यावर मोटरना बंदी घातली गेली. १९३३ मध्ये या रस्त्याचा समावेश हायवे मध्ये करण्यात आला. आता या रस्त्यावर अगदी आणीबाणी उद्धवली तरच इमर्जन्सी गाड्यांना परवानगी दिली जाते.

या हायवेचे दुसरे वैशिष्ठ म्हणजे तो जेथून सुरू होतो तेथेच संपतो. म्हणजे १२.८ किमी लांबीचा हा हायवे चक्क गोलाकार आहे. मॅकीनॅक नावाच्या बेटावर हा रस्ता असून हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सायकल आणि घोडे हीच या रस्त्यांवरील प्रमुख वाहतूक साधने आहेत.

Leave a Comment