घरगुती सिलिंडरचे दर घटले, व्‍यावसायिकमध्ये वाढ

cylinder
नवी दिल्‍ली – पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ४४ रुपये ५० पैशांनी कपात केली आहे. मात्र व्‍यावसायिक सिलिंडरचा दर ११५५ रुपये ५० पैशांऐवजी १२०० रुपये असा वाढविण्यात आला आहे. नवीन दरानुसार घरगती सिलिंडरची किंमत ५१७ रुपये राहणार आहे.

सध्‍या घरगुती गॅस सिलिंडरची किंमता ६१५ रुपये ५० पैसे रुपये आहे. या दरांमध्‍ये आता ४४ रुपाये ५० पैसे रुपयांची कपात करण्यात आली आहे. दरम्‍यान, सिलिंडरची किंमत कमी झाल्‍याने ग्राहकांना प्रति सिलिंडर सबसिडीमध्येही कपात होणार असून, ती १७७ रुपये ६८ पैसे एवढी राहणार आहे.

चार महिन्‍यांत चार वेळा घसगुती गॅसच्‍या किंमतीमध्‍ये कपात झाली आहे. सप्‍टेंबर महिन्यात २६ रुपये ५० पैसे ऑगस्‍टमध्‍ये २४ रुपये; तर जुलै महिन्यात १७ रुपये कमी करण्‍यात आले. त्‍यामुळे जूनपेक्षा ग्राहकांना १२७ रुपये कमी दरांनी ग्राहकांना सिलिंडर स्‍वस्‍त दरात मिळणार आहे.

Leave a Comment