गूगलला भेट दिल्यानंतरही मोदी अजूनही ‘जगातील सर्वांत मूर्ख पंतप्रधान’

modi
नवी दिल्ली : अमेरिकेच्या दौऱ्याहून भारतात नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले असून मोदींनी या दौऱ्यात अमेरिकेत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचीही भेट घेतली. पण, पिचाईंची भेट घेणारे पंतप्रधान ‘जगातील सर्वात मूर्ख पंतप्रधान आहेत’ असे गूगल सर्चवर अजूनही दिसत आहे.

मोदींचे या दौऱ्याच्या वेळी स्वागत खुद्द सुंदर पिचाई यांनी केले होते. तरीही, आत्ता तुम्ही गूगल इमेजवर जाऊन ‘world’s most stupid prime minister’ असा सर्च कराल तर तुम्हाला यात पंतप्रधान मोदींचा फोटो दिसेल.

असे काही पहिल्यांदाच घडले असेही नाही. अशी घटना यापूर्वीही समोर आली होती. गूगलला यासाठी सोशल मीडियानं धारेवरही धरले होते. त्याचबरोबर अल्गोरिदम बदलण्याचा सल्लाही मिळाला होता. पण, यातून गूगलने कोणताही धडा घेतलेला नाही. आत्ता पुन्हा एकदा जगातील सर्वात मुर्ख पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा फोटो समोर येताना दिसत आहे. यापूर्वीही ‘टॉप टेन क्रिमिनल्स’ (गुन्हेगार) असा सर्च केल्यानंतरही नरेंद्र मोदींचा फोटो गूगलवर दिसत होता. यानंतर, लोकांसोबतच काँग्रेसनेही याचा समाचार घेतला होता. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याचा स्क्रीन शॉट टाकत ‘माझे पंतप्रधान मोदींशी हजार मुद्यांवर वाद असतील पण, गूगलच्या टॉप १० क्रिमिनल्समध्ये पंतप्रधानांचा फोटो सहन केला जाणार नाही’ असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment