३७७० कोटींची परदेशी संपत्ती जाहीर

black-money
नवी दिल्ली – केंद्र सरकारने काळा पैसा बाळगणा-यांवर कारवाई करण्यापूर्वी परदेशातील अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत ६३८ जणांनी परदेशातील अघोषित संपत्ती जाहीर केली आहे. यातून एकूण मिळून ३७७० कोटी रुपयांच्या परदेशातील संपत्तीची माहिती सरकारकडे जमा झाली आहे.

काळा पैसा बाळगणा-यांसाठी विशेष कायदा करण्यात आला असून, या कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारने ही मुदत दिली होती. या कायद्यातंर्गत १० वर्षाच्या तुरुंगवासाची आणि जबर आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतुद आहे. ३० सप्टेंबर २०१५ मध्यरात्रीपर्यंत ही अघोषित परदेशी संपत्ती जाहीर करण्यासाठी मुदत होती. संपत्ती जाहीर करणा-यांचा आकडा उत्साहवर्धक नसून, मोठा गाजावाजा झालेल्या योजनेला हा थंड प्रतिसाद असल्याचे तज्ञांनी सांगितले. यातून बेहिशोबी मार्गाने संपत्ती जमवणारे हाती लागण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ञांनी सांगितले.

Leave a Comment