मुंबई : लवकरच नवे फीचर लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर लॉन्च करणार असून या फीचरमुळे १४० पेक्षा अधिक शब्द वापरता येणार आहे. सध्या ट्विटरवर फक्त १४० शब्दामध्येच ट्विट करता येते.
लवकरच १४० पेक्षा अधिक शब्दात करता येणार ट्विट
या नव्या फीचरसाठी ट्विटरची टीम काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. १४० शब्दांमध्ये एखाद ट्विट करणे हे ट्विटरचे ट्रेडमार्क समजले जाते. मात्र, आता अधिक शब्दांमध्ये ट्विटसाठी ट्विटर प्रयत्नशील आहे.
ट्विटरमध्येही ट्विटच्या शब्दांची संख्या वाढवण्यावरुन मतभेद असल्यामुळे शब्द संख्या नक्की कधीपासून वाढवली जाईल, याबाबत आताच काही सांगता शक्य नाही. मात्र, ट्विटरची टीम या नव्या बदलासाठी काम करत आहे.