किमान ५० कोटीं लोकांचा खात्मा करण्याच्या तयारीत इसिस

isis
इस्लामिक स्टेट म्हणजे इसिसने एकाचवेळी किमान ५० कोटी लोकांचा खात्मा करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी ते अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय घेतील असा दावा जर्मन पत्रकार जर्गन टोडेनहॉपर यांनी त्यांच्या इनसाईड आयएस,१० डेज इन इस्लामिक स्टेट या पुस्तकात केला आहे. ७५ वर्षीय जर्गन या अतिरेक्यांमध्ये कांही काळ वास्तव्य करून आले आहेत. अनेक वर्षे अमेरिकेच्या मध्यपूर्वेबाबतच्या धोरणांवर सातत्याने जर्गन टीका करत आले आहेत व त्यामुळेच त्यांना इसिसच्या कॅम्पमध्ये कांही काळ वास्तव्याची परवानगी मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.

जर्गन लिहितात, इसिसला पश्चिमी देशातील प्रत्येक नागरिकाला ठारच करायचे आहे. पूर्ण जगावर इस्लामी शासन आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते अणुत्सुनामी आणू शकतात. जे त्यांच्या विरोधात आहेत त्या सर्वांना एकदमच खलास करण्याची त्यांची तयारी सुरू आहे. हे अतिरेकी गुहा, पडकी घरे, बराकीतून राहतात, जमिनीवर झोपतात. शिरच्छेदाचे व्हिडीओ सातत्याने प्रकाशित करण्यामागे जगावर दहशत बसविण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांना रोखणे अवघड आहे व रोखायचे झाले तर ते काम फक्त अरबच करू शकतील असेही जर्गन यांचे म्हणणे आहे.

इसिसच्या निशाण्यावर केवळ शियाधर्मीय, हिंदू, ख्रिश्चन, ज्यूच आहेत असे नाही तर नास्तिक मुस्लीम आणि त्यांच्या विरोधात बोलणारे मुस्लीमही त्यांच्या निशाण्यावर आहेत.
——–

Leave a Comment