मुंबई: आपल्या यूजर्ससाठी एक नवी भेट नवनवे बदल करुन कायम अपडेट राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या फेसबुकने दिली असून आता त्यामुळे तुम्ही तुमचे प्रोफाईल फोटो आणखी सुंदर बनवू शकता.
आता तुमचा ‘व्हिडिओ’ही होणार तुमचा प्रोफाईल पिक्चर!
मोबाइल प्रोफाइलला फेसबूकने रीडिझाईन केल्यामुळे आता आपण एखादा छोटा व्हिडिओ तुमचा प्रोफाईल फोटो ठेऊ शकता. फेसबुकने आपल्या यूजर्सना पहिल्यांदाच असे फीचर दिले आहे. ७ सेंकदाचा व्हिडिओ तुम्ही प्रोफाईल फोटो म्हणून ठेऊ शकता. तसेच अॅनिमेटेड पिक्चर्सही तुम्ही प्रोफाईल फोटो ठेवता येणार आहे.
प्रोफाईलमध्ये होणारे हे बदल सेलिब्रेट प्राईड फीचरपासून प्रेरित असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.