मुंबई आणि पुण्यात क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर

cm
मुंबई : मायक्रोसॉफ्टने क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील यावेळी उपस्थित होते.

लवकरच भारतात मायक्रोसॉफ्टचे एकूण तीन सर्व्हर दिसतील. यातील दोन महाराष्ट्रात तर तीसरा सर्व्हर चेन्नईमध्ये स्थापित केला जाईल. महाराष्ट्रातील एक सर्व्हर मुंबई आणि दुसरा सर्व्हर पुणे येथे असेल. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा चांगल्या असून ग्राहकही मोठ्या प्रमाणात असल्याने या राज्यात क्लाऊड डेटा सर्व्हिसचे दोन सर्व्हर उभारण्याचा निर्णय घेतल्याचे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी स्पष्ट केले आहे.

मीडिया आणि एन्टरटेन्मेंटच्या विस्ताराला या सर्व्हरमुळे मोठी संधी मिळणार असून या सर्व्हरमध्ये साठवण्यात आलेली माहिती ही संपूर्णपणे मालकाच्या हाती असणार आहे. राज्य सरकारने मायक्रोसॉफ्टला सर्व्हर उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असून त्या मोबदल्यात कंपनी अमरावतीमधील मेळघाटमध्ये डिजीटल गाव उभे करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे.

Leave a Comment