टाटा ग्रुपचा स्मार्टसिटी उभारणीत सहभाग

smart
टाटा कंपनीच्या टाटा प्रोजेक्टसने कंपनी केंद्राच्या महत्त्वाकांक्षी स्मार्टसिटी योजनेत सहभागी होणार असल्याचे आणि त्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली असल्याचे जाहीर केले आहे. स्मार्टसिटी बिझिनेस प्रमुख व कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट गौतम बाळकृष्णन यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, स्मार्टसिटी व्यवसायासाठी आम्ही वेगळा विभाग स्थापन केला आहे व त्यात स्मार्टसिटीअंतर्गत १०० ते ५०० कोटींच्या योजनात भागीदारी करण्याची तयारी आम्ही केली आहे. स्मार्टसिटीसाठी वायफाय सेवा, सुरक्षा तंत्रज्ञान स्थापना, घनकचरा व्यवस्थापन, टोल कलेक्शन अशा बाबींत आम्ही योगदान देणार आहोत. यासाठी तांत्रिक व आर्थिक मदतीसाठी कांही आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर सहकार्यासाठी बोलणी सुरू आहेत. केंद्राने पहिल्या टप्प्यात २० स्मार्टसिटी उभारणीची घोषणा केली आहे.

Leave a Comment