चीनी क्विकू चे तीन स्मार्टफोन बाजारात दाखल

qiku
क्विहू ३६० व कूलपॅड या कंपन्यांचे जॉईंट व्हेंचर असलेल्या क्विकू या चिनी स्मार्टफोन कंपनीने आशियाई बाजारात प्रवेश करताना अफलातून असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. अँड्राईडवर आधारित या फोन्ससारखी फिचर्स अन्य स्मार्टफोनमध्ये आढळणार नाहीत असा दावाही कंपनीने पदार्पणातच केला आहे.चिनी बाजारात हे फोन विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत आणि भारतात ते आक्टोबरमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत.

हायएंड व मिडरेंज तसेच एंट्री लेव्हल अशा तिन्ही पातळ्यांवर हे फोन सादर झाले आहेत. सर्व फोनसाठी फिंगरप्रिट सेन्सर दिले गेले आहेत. हाय व मिड रेंजसाठी ६ इंची स्क्रीन व एंट्री लेव्हलसाठी ५.५ इंची स्क्रीन दिला गेला आहे. या सोबत क्विकू अॅपस्टोअरही असणार आहे. सर्व फोनसाठी १३ एमपी चा एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे मात्र एंट्री लेव्हलमध्ये फक्त लेन्सचा फरक आहे. कॅमेर्‍यांची क्षमता सगळीकडे सारखीच आहे. सिल्व्हर आणि गोल्ड कलरमध्ये हे फोन मिळतील.

हायएंडसाठी ४ जीबी रॅम व ६४ जीबी मेमरी, मिडरेंजसाठी ३ जीबी रॅम व १६ जीबी मेमरी तर एंट्री लेव्हलसाठी २ जीबी रॅम व १६ जीबी मेमरी दिली गेली आहे. हाय व मिडरेंजसाठी ३७ तासांचा टॉकटाईम व १४ तासांचा व्हिडीओ बॅकअप असलेली बॅटरी दिली गेली आहे तर एंट्री लेव्हलसाठी २८ तासांचा टॉकटाईम बॅकअप असलेली बॅटरी आहे.

Leave a Comment