एडवर्ड स्नोडेन ट्विटरवर प्रकटला

edward
अमेरिकी राष्ट्रीय तपास संस्थेची गुपिते व अमेरिकेकडून जगातील अन्य देशांचे प्रमुख, नागरिकांवर केल्या जात असलेल्या हेरिगिरीची लक्तरे चव्हाट्यावर आणणारा एडवर्ड स्नोडेन आता ट्विटरवर प्रकटला आहे. स्नोडेनने नुकतेच ट्विटर अकौंट उघडले असून एक तासात त्याला १ लाख ८६ हजार फॉलाअर्स मिळाले असल्याचे समजते.

स्नोडेन हा अमेरिकी राष्ट्रीय तपास संस्थेत कॉन्ट्रॅक्टर म्हणून कार्यरत असताना अमेरिकेकडून केल्या जात असलेल्या हेरगिरीसंदर्भातली अनेक कागदपत्रे त्याने फोडून सार्वजनिक केली होती. त्यानंतर तो अमेरिकेतून बाहेर पडला. अमेरिकेत आज स्नोडेन नंबर १ चा वॉटेड आहे. तो रशियातील मास्को येथे गुप्तरितीने राहात असल्याचेही सांगितले जात आहे.

ट्विटरवर स्नोडेनने कॅन यू हिअर मी नाऊ? अशा पोस्टसोबत प्रवेश केला आहे. स्नोडेनने २०१३ साली उघड केलेल्या अमेरिकेच्या अन्य देश प्रमुखांवर ठेवण्यात आलेल्या नजरेसंदर्भात व सर्वसामान्यांसह मान्यवरांच्या इंटरनेट व फोन टॅपिंग संदर्भातील कागदपत्रांमुळे जगभर खळबळ माजली होती. स्नोडेनने या प्रकारची १० लाखांहून अधिक गुप्त कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. अजूनही त्याच्याकडे बरीच महत्त्वाची माहिती आहे असेही सांगितले जात आहे. अमेरिकेने रशियाकडे स्नोडेनला परत पाठविण्याची मागणी केली होती मात्र रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी ती साफ फेटाळून लावली होती.

Leave a Comment