लवकरच मुंबई सेंट्रल स्टेशनवर मोफत वायफाय

mumbai-central
मुंबई : २०१६ पर्यंत मोफत वायफाय सुविधा देशातील ४०० रेल्वेस्थानकांवर सुरु करण्यात येणार असून हा उपक्रम जगप्रसिद्ध जाइंट सर्च इंजिन गूगल राबवणार आहे. गूगलने या उपक्रमासाठी भारतीय रेल्वेची मदत घेतली आहे. या उपक्रमाची सुरुवात देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबापुरीतून होणार आहे.

या मोफत वायफाय सुविधेचा शुभारंभ मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावरुन होणार आहे. ऑक्टोबर २०१५ च्या मध्यापासून मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा सुरु होईल असा अंदाज आहे, असे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

1 thought on “लवकरच मुंबई सेंट्रल स्टेशनवर मोफत वायफाय”

Leave a Comment