‘इंटरनेट.ओराजी’चा ‘डिजिटल इंडिया’च्या प्रोफाईल फोटोंशी संबंध नाही

mark
नवी दिल्ली – फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने ‘डिजिटल इंडिया’ या मोदींच्या महत्वाकांक्षी उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी फेसबुक प्रोफाईल फोटो राष्ट्रध्वजाच्या रंगात बदलण्याची सुविधा देऊन फेसबुकने ‘इंटरनेट.ओराजी’साठी पाठिंबा मिळविण्याचा हेतू छुप्या पद्धतीने साध्य करून घेतल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

‘इंटरनेट.ओराजी’ या फेसबुकच्या उप्रकमालाही ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या पाठिंब्यासाठी फेसबुकचा प्रोफाईल फोटो तिरंगी रंगात बदलल्यास पाठिंबा मिळतो, हा निव्वळ गैरसमज असून ‘इंटरनेट.ओराजी’चा ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाशी काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मार्क झुकरबर्गने दिले आहे. प्रोफाईल फोटो बदलण्याच्या लिंकमधील कोडमध्ये आमच्या इंजिनिअरने चुकून ‘इंटरनेट.ओराजी प्रोफाईल पिक्चर’ असे म्हटले आहे. मात्र, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘इंटरनेट.ओराजी’ हे दोन्ही उपक्रम संपूर्णपणे वेगळे आहेत. तसेच हा कोड देखील आम्ही त्वरित बदलणार आहोत, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

तत्पूर्वी अमेरिका दौ-यात फेसबुकच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट देऊन मार्क झुकरबर्गसोबतच्या संवादावेळी ‘डिजिटल इंडिया’बद्दल माहिती दिली होती. मोदींच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी झुकरबर्गने पुढाकार घेऊन सर्वप्रथम स्वत:चा फेसबुक प्रोफाईल फोटो तिरंगी रंगात बदलला होता. त्यानंतर संपूर्ण भारतात फेसबुक युजर्सने ‘डिजिटल इंडिया’ला पाठिंबा देण्यासाठी आपले प्रोफाईल फोटो फेसबुकने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेनुसार तिरंगी रंगात बदलण्यास सुरूवात केली. मात्र, हे प्रोफाईल फोटो बदलताना फेसबुकने दिलेल्या लिंकमध्ये ‘इंटरनेट.ओराजी’चा समावेश असल्याचे समोर आल्यामुळे ‘डिजिटल इंडिया’च्या नावाखाली फेसबुकने प्रोफाईल फोटो बदलण्याच्या सुविधेच्या माध्यमातून ‘इंटरनेट.ओराजी’ला पाठिंबा मिळविला असल्याचा आरोप करण्यात आला. फेसबुकचे ‘इंटरनेट.ओराजी’ हे देशात नेट न्युट्रिलीटी या वर्गवारीत मोडणारी सुविधा आहे. इंटरनेट स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणा-या नेट न्युट्रिलीटीला नेटिझन्सचा कडाडून विरोध आहे.

Leave a Comment