इंटरनेटमुळे पोर्न व्यवसायाची कमाई घटली

internet
गेली कांही वर्षे इंटरनेटमुळे पोर्न व्यवसायाला अधिक चालना मिळाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पोर्न इंडस्ट्रीची कमाई इंटरनेट वापर वाढल्यापासून कमी होत चालल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. इंटरनेटमुळे पोर्न साईटपर्यंत पोहोचणे सुलभ झाले असले तरी पोर्न इंडस्ट्रीला पूर्वी ज्या प्रमाणात फायदा होत होता तो लक्षणीयरित्या कमी होत चालला आहे. इतकेच नव्हे तर पोर्न स्टुडिओची संख्याही लक्षणीयरित्या कमी होत चालल्याचेही दिसून आले आहे.

द इकॉनॉमिस्टने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी पोर्न व्यवसाय तेजीत होता कारण त्यावेळी पोर्न साईटपर्यंत जाणे तितकेसे सुलभ नव्हते, त्यासाठी नियमही कडक होते. त्यामुळे १९९०च्या दशकात प्रचंड मोठ्या रकमा घेऊन पोर्न डिव्हीडी कॅसेट विकल्या जात असत. हा सर्वच व्यवहार छुपेपणाने होता व त्यामुळे मागेल ती किंमत त्यासाठी मोजण्याची लोकांची तयारी होती. अमेरिकेत या काळात डझनावारी पोर्न कॅसेट निर्माते होते. इंटरनेटच्या सुरवातीच्या काळातही पोर्न इंडस्ट्रीची कमाई चांगलीच होती. त्यावेळी अशा ३ हजारांहून अधिक साईट होत्या. मात्र त्या छोट्या असत आणि त्यासाठी सबस्क्राइब करावे लागत असे. आता मात्र या व्यवसायाला उतरती कळा लागली असून अमेरिकेतील पोर्न स्टुडिओंची संख्याही या काळात २०० वरून अवघ्या २०वर आली असल्याचे सांगितले जात आहे.

या क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने ग्राहकाकडून कंटेंटची मागणी वाढती राहिली आहे मात्र स्पर्धेमुळे कमाई कमी होऊ लागली असल्याचे एक्स बिझिनेसचे संपादक एलेक हेल्मी यांनी सांगितले.

Leave a Comment