मुंबई: चौथे द्विमासिक पतधोरण जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेने गृहकर्जदारांना दिलासा दिला असून रेपो दरात ०.५ टक्क्यांनी आरबीआयने कपात केल्यामुळे रेपो रेट आता ६.७५ टक्के झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटही ५.७५ टक्क्यांवर आला आहे.
रेपो रेटमध्ये ०.५ टक्क्यांची कपात
त्याचबरोबर सीआरआरमध्ये कोणताच बदल आरबीआयने न केल्यामुळे सीआरआर ४ टक्केच राहणार आहे.
व्याजदर कपातीची आशा बाळगलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आरबीआयच्या या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सर्वसामान्यांच्या कर्जावरील मासिक हप्त्याच्या व्याजदरात बदल होण्याची चिन्ह आहेत. आरबीआयने यापूर्वी २ जूनला रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली होती. या वर्षभरात तीन वेळा व्याजदरात कपात झाली आहे.