गुगलकडून मोदींचे खास स्वागत

google
भारताचे पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा संपवून भारताकडे रवाना झाले असले तरी अजूनही तेथे मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर चर्चा सुरूच आहेत. जागतिक सर्च इंजिन गुगलनेही पंतप्रधान मोदींचे खास स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करून चर्चेत भर घातली आहे. गुगलने केवळ त्यांच्या कार्यालयातच मोदींचे स्वागत केले नाही तर त्यांच्या होमपेजवरही मोदींचे खास स्वागत केले गेले. विशेष म्हणजे गुगलवर प्रथमच भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करताना होमपेजवर कांही मजकूर लिहिला गेला आहे.

गुगलने मोदी स्वागतासाठी होमपेजवर एम अक्षराचा लोगो बनविला आणि सर्च इंजिनवर लोकांसह पीएम मोदी यांचे स्वागत अशी टॅगलाईन देतानाच गुगलने एक खास ब्लॉगही लिंक केला. या ब्लॉगवर मोदींच्या अमेरिका दौरा संदर्भातली सर्व माहिती व मोदींनी केलेल्या घोषणा हिंदीत प्रकाशित केल्या. एशिया पॅसिफिक नावाच्या या ब्लॉगचे प्रकाशन गुगलचे सीईओ पिचाई यांनी केले.

Leave a Comment