तुम्ही म्हातारे होऊ नये याची काळजी घेणार गुगल

anti-aging
जागतिक सर्च इंजिन गुगलने २७ सप्टेंबरला १७ वा वाढदिवस साजरा करत असतानाच दोन नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. गुगलची बायोटेक व्हेचर कॅलिको म्हातारणपण दूर ठेवणारी एंटी एजिंग थेरपी तसेच मधुमेह यावर उपयुक्त थेरपी बनविण्यावर संशोधन करत असल्याचे गुगलने जाहीर केले आहे. हे संशोधन प्रामुख्याने म्हातारपण व त्यामुळे येऊ शकणारे आजार थांबविणे यासाठी केले जात असल्याचे समजते.

गुगलचे संस्थापक लॅरी पेज म्हणाले लोकांनी किमान १०० वर्षे तरी निरोगी जीवन जगावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे म्हातारणपण येऊ नये तसेच म्हातारपणातील आजार व व्याधी थांबविता याव्यात यासाठी संशोधन केले जात आहे. आज जगात अँटी एजिंगची बाजारपेठ ३०० अब्ज डॉलर्सच्या घरात आहे त्यावरही आमची नजर आहे. कॅलिको ही आमची बायोटेक व्हेंचर कंपनी आहे. २०१३ साली स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीत मधुमेहासाठीही संशोधन सुरू असून नुकतेच रक्तातील शर्करा मोजण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स तयार केले गेले आहेत.

मधुमेहात रक्तशर्करेचे प्रमाण मोजण्यासाठी सुई टोचून रक्त घ्यावे लागते. नवीन लेन्समुळे व त्यात बसविलेल्या सेन्सरमुळे डोळ्यातील अश्रूंच्या तपासणीतूनच साखरेचे प्रमाण समजू शकणार आहे. या लेन्ससाठीचे पेटंटही गुगलला मिळाले आहे. आता म्हातारपण थांबविणे हे आमच्यापुढचे मोठे ध्येय आहे.

वास्तविक गुगलची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ ला झाली आहे. मात्र २००५ पासून गुगल आपला वर्धापनदिन २७ सप्टेंबरला साजरा करते आहे.

Leave a Comment