टायर उद्योगात होणार क्रांती

tyres
जर्मनी आणि फिनलंड येथील संशोधकांनी विकसित केलेल्या नव्या रबरामुळे कारसाठी लागणार्‍या टायर उद्योगात अभूतपूर्व क्रांती होईल असा दावा संशोधकांनी केला आहे. टायर उद्योगात क्रांती होण्याबरोबरच कारमालकांसाठीही टायर पंक्चरची डोकेदुखी कायमची संपणार असल्याचेही सांगितले जात आहे.

आजपर्यंत वाहनांसाठी बनविलेल्या टायरमध्ये उत्पादक रबर मजबूत बनविण्यासाठी सल्फर व इलेस्टीकच्या मिश्रणाचा वापर करत आले आहेत. रबरात लांब लांब रेषा असलेले धागे असतात.या धाग्यांना मजबूती दिली जाते मात्र तरीही एखादी टोकदार वस्तू, खिळा, काचेचे तुकडे टायरमध्ये घुसले तर हे धागे तुटतात व टायर पंक्चर होते. संशोधकांनी आता अत्याधिक ताणले जाईल असे रबर विकसित केले आहे. अतिताणाबरोबर हे रबर इतके मजबूत बनविले गेले आहे की ते पंक्चर झाले तर टायर बदलासाठी मेकॅनिकची गरज पडणार नाही कारण हे टायर आपोआपच जुळून येणार आहे. त्यासाठी रबरात सिलीकॉन आणि कार्बन ब्लॅकच्या मिश्रणाचा वापर केला गेला आहे.

सध्या प्रायोगिक तत्वावर हे रबर बनविले गेले आहे मात्र लवकरच त्याचा व्यावसायिक तत्त्वावरही उपयोग सुरू केला जाणार असल्याचे समजते. यासाठी येणारा खर्चही तुलनेने कमी आहे शिवाय टायर पंक्चर होण्याची शक्यता नसल्याने ते परवडणारेही होईल असेही संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment