मोदी सरकारचे १६ महिनेच देशासाठी चांगले गेले – बजाज

rahul-bajaj
नागपूर – यापूर्वीच्या काँग्रेस सरकारपेक्षा मोदी सरकारचे १६ महिनेच देशासाठी चांगले गेल्याची पावती उद्योगपती राहुल बजाज यांनी दिली आहे. पण, याचा अर्थ सरकारच्या ५ वर्षाच्या कारकिर्दीनंतरच देशात चांगले बदल बघायला मिळतील असे नव्हे. तर सरकारने केलेल्या कामांची समिक्षा दर महिन्यांनी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच सरकारवर आपला वॉच असल्याचे संकेतही त्यांनी दिले. नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेले राहुल बजाज कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजकीय विरोधकांच्या माध्यमातून टीका होत असली, तरीही देशातील उद्योगपतींचे त्यांना समर्थन असल्याचे चित्र देशात आहे. मोदी सरकारने गेल्या १६ महिनात चांगली कामगिरी केल्याचे सांगत आपण या सरकारबद्दल आशावादी असल्याचे उद्योगपती आणि बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या काळात चांगली कामगिरी झाली, असली तरीही कोलगेट, २जी सारख्या घोटाळ्यांमुळे त्या सरकारची निर्णय क्षमता संपल्याचे ते म्हणाले. त्या तुलनेत मोदी सरकारने बँक, विदेशी गुंतवणूक, संरक्षण खात्याच्या क्षेत्रात चांगलेच निर्णय घेतल्याचे सांगत राहुल बजाज यांनी मोदी सरकारची पाठराखण केली.

Leave a Comment