मायक्रोमॅक्सचे तीन बजेट स्मार्टफोन

canwas
नवी दिल्ली- मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीने आपले तीन नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ‘कॅनवस ब्लेज ४जी’, ‘कॅनवस फायर ४जी’ आणि ‘कॅनवस प्ले ४जी’ हे तीन स्मार्टफोनची किंमत सामान्यांना परवडणारी आहे. या स्मार्टफोनची विक्री सुरू करण्यात आली आहे.
कॅनवस ब्लेज ४जी, ‘कॅनवस फायर ४जी’ या स्मार्टफोनची किंमत सहा हजार ९९९ रुपये आहे तर ‘कॅनवस प्ले ४जी’ ची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. हे तिन्ही स्मार्टफोनमध्ये ५.१ लॉलीपॉप ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

‘कॅनवस ब्लेज ४जी’ चे फिचर्स
» ४.५ इंच डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.१ गिगाहर्ट्झ कॉडाकोर कॉलकोम स्नॅपड्रागन प्रोसेसर » एक जीबी रॅम » ४८०X८५४ पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » पाच मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप » २००० एमएएच बॅटरी

‘कॅनवस फायर ४जी’चे फिचर्स
» ४.५ इंच डिस्प्ले » आठ जीबी इंटरनल मेमरी » १.१ गिगाहर्ट्झ कॉडाकोर मिडिया टेक प्रोसेसर » एक जीबी रॅम » ४८०X८५४ पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » पाच मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप » १८५० एमएएच बॅटरी

‘कॅनवस प्ले ४जी’ चे फिचर्स
» ५.५ इंच डिस्प्ले » १६ जीबी इंटरनल मेमरी » १.२ गिगाहर्ट्झ कॉडाकोर कॉलकोम स्नॅपड्रागन प्रोसेसर » दोन जीबी रॅम » ७२०X१२८० पिक्सल स्क्रिन रेझ्योल्यूशन » १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा » पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा » अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप » २८२० एमएएच बॅटरी

Leave a Comment