सोने झळकले, चांदीही चमकली

chandi
परदेशातील सोने चांदी खरेदीसाठी अनुकुल झालेले वातावरण आणि आगामी सणांचे दिवस लक्षात घेऊन सराफांनी मोठ्या प्रमाणावर सुरू ठेवलेली सोनेचांदी खरेदी याचा परिणाम सोन्याचे दर पुन्हा एकदा २७ हजारांच्या वर तर चांदीचे दर किलोला ३६५०० रूपयांवर जाण्यात झाला आहे. बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती सतत तिसर्‍या दिवशी चढ्याच राहिल्या आहेत.

सोन्याचे दर तीन दिवसांत ४०० रूपयांनी तर चांदीचे दर ११०० रूपयांनी वधारले आहेत. नजीकच्या काळात हे दर घरसण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. भारतात सणांसुदीचे दिवस तोंडावर आहेत.या काळात सोने चांदीला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्याकाळात सोने चांदीची चणचण जाणवू नये यासाठी सराफ वर्गाने खरेदी सत्र सुरू केले आहे. हे खरेदी प्रमाण वाढतच चालले असल्याने दर चढू लागले असल्याचे समजते.

Leave a Comment