कापूस खरेदीला १५ नोव्हेंबरचा मुहूर्त

kapus
वर्धा : कापूस पणन महासंघाचे संचालक व वरिष्ठ अधिका-यांच्या वादात अखेर १५ नोव्हेंबरला कापूस खरेदीचामुहूर्त निश्चित करण्यात आला. मात्र मुहूर्ताचा विलंब शेतक-यांची परवड करणारा ठरण्याची भीती संचालकच व्यक्त करीत आहेत. महासंघाची तोट्यातील संस्था ही प्रतिमा एकीकडे तर शेतक-यांची परवड थांबविणे ही दुसरी बाब, अशा कात्रीत मुहूर्ताची बाब पुढील बैठकीत अधिक वादाची ठरण्याची शक्यता काही संचालकांकडून ऐकायला मिळाली.
कापूस गाठीच्या बाजारात मंदी अपेक्षित धरून या हंगामात महासंघाकडे हमीदरावर प्रचंड प्रमाणात कापूस खरेदी होण्याची महासंघाच्या प्रशासनाची अपेक्षा आहे. आठवड्यापूर्वी महासंघाच्या संचालक मंडळाच्या सभेत यावर चर्चा झाली. प्रचंड खरेदी होण्याच्या शक्यतेमुळे मुहूर्तावरच प्रारंभी खल झाला. काही संचालकांच्या १ नोव्हेंबरला म्हणजे लवकर खरेदी करण्याच्या आग्रहास मोडता घालून वरिष्ठ अधिका-यांनी १५ नोव्हेंबरवर भर दिला. प्रारंभी खरेदीस येणा-या कापसात आद्र्रतेचे प्रमाण अधिक असते म्हणून विलंबाने कापूस खरेदी करण्याची अधिका-यांची भूमिका होती पण काही संचालकांनी त्यावर
आक्षेप घेतला. ही संस्था शेतक-यांची आहे. म्हणून शेतक-यांची परवड न होण्यास प्राधान्य द्यावे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर शेतकरी कापूस विक्रीची घाई करतो. काही भागांत सीतादेवीचा म्हणजेच कापूस वेचणीच्या आरंभाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत.

Leave a Comment