वर्तुचा १३ लाख ८ हजारांचा सर्वात महागडा स्मार्टफोन

vartu
मुंबई : वर्तु या प्रीमियम स्मार्टफोन कंपनीने एक स्मार्टफोन लॉन्च केला असून ज्याची किंमत ६५०० ते १३७०० पाऊंड म्हणजेच ६.५ लाख ते १३.८ लाखांपर्यंत आहे. लेदर कव्हरवर आधारित या स्मार्टफोनच्या किंमती आहेत. सिग्नेचर स्मार्टफोनचे हा स्मार्टफोन अपग्रेडेड व्हर्जन मानले जात आहे. वर्तु सिग्नेचर टचचा एचडी डिस्प्ले ५.२ इंचाचा आहे. डिस्प्लेचे रिझॉल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे.

पाचव्या जनरेशनचे क्रिस्टल प्रोटेक्शन या डिस्प्लेला दिले गेले आहे. ५.१ लॉलिपॉप ओएस या ऑपरेटिंग सिस्टिमवर सिग्नेचर टच काम करु शकेल. या हाय-एंड स्मार्टफोनमध्ये ६४ बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर असणार आहे. त्यासोबतच ४ जीबीचा रॅमही असेल आणि ४३० एड्रिनो जीपीयू असेल.

८ लेदर बॉडी व्हेरिएंटमध्ये वर्तुच्या हा नवा प्रीमियम स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये जेट काफ, गार्नेट काफ, ग्रेप लिजार्ड, प्युअर जेट लिजार्ड, जेट एलिगेटर, प्युअर नेव्ही एलिगेटर, क्वॉलडे पेरिस एलिगेटर आणि प्युअर जेट रेड गोल्ड यांचा समावेश असेल. या फोनमध्ये ड्युअल टोन एलईडी फ्लॅशसोबत f/2.2 अपॅरचर असलेला २१ मेगापिक्सेलचा फेस डिटेक्शन ऑटो फोकस रिअर कॅमेरा असणार आहे. रिअर कॅमेऱ्यामधून ४के रिझॉल्युशन व्हिडीओ रेकॉर्ड करता येणार आहे. ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनचे स्टोरेज तब्बल 2 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या हँडसेटची प्री-बुकिंग काही निवडक आऊटलेटवर होणार आहे. ही बुकिंग 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान करता येणार आहे.

Leave a Comment