आता आयडियाचीही प्रति सेकंद बिल आकारणी

idea
मुंबई – आयडिया कंपनीने देशातील सर्वच प्रीपेड ग्राहकांना कॉल ड्रॉपच्या बडग्यातून वाचण्यासाठी प्रति सेकंद बिल योजनेत स्थलांतरित केल्यामुळे ग्राहकांना जितके बोलाल, त्याचेच पैसे भरावे लागतील. देशातील कोणत्याही नेटवर्कला फोन करताना ही सुविधा मिळेल.

कॉल ड्रॉपबाबत दूरसंपर्क खात्याने कठोर भूमिका घेतल्यामुळे कॉलड्रॉपचा फायदा कंपन्यांना होत आहे का ? याची तपासणी कंपन्यांकडून केली जात असल्यामुळे आयडियाने आपल्या प्रीपेडधारकांना प्रति सेकंद योजनेत हलवले आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.

देशभरात १.५ दशलक्ष आयडियाचे ग्राहक आहेत. येत्या ३० दिवसांत त्यांना प्रति सेकंद योजनेत स्थलांतरित केले जाईल. देशात कॉल ड्रॉपची समस्या वाढू लागली आहे. त्यावर बोलताना दूरसंपर्क सचिव राकेश गर्ग म्हणाले की, ग्राहकांना मोफत मिनिटांची सुविधा देणा-या योजना आणायला हव्यात. तसेच बिल हे प्रति मिनिट पद्धतीने आकारायला हवे.

Leave a Comment