अॅपल आय ६ एस खरेदीच्या लाईनीत रोबो

kely
अॅपलच्या नव्या आयफोन ६ एसचे मालक होण्यासाठी जगभरातील ग्राहकांनी अॅपल स्टोअर्ससमोर रांगा लावल्या असतानाच ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे राहणार्‍या ल्यूसी केन या महिलेने मात्र ऑफिसमध्ये सुट्टी न घेताही आयफोन सिक्स एस मिळविला आहे. त्यासाठी तिने स्मार्ट आयडिया लढविली. तिने तिच्याऐवजी चक्क रोबोलाच खरेदीदारांच्या लायनीत उभे केले आणि शुक्रवारी विक्री सुरू होताच सर्वप्रथम आयफोन सिक्स एस खरेदी करणार्‍या ग्राहकांमध्ये आपलेही नांव सामील करून घेतले.

ल्यूसी सांगते, मला रजा न घेताच आयफोन सिक्स एस सर्वप्रथम मिळवायचा होता. माझ्या ऑफिसात अनेक रोबो आहेत. त्यावरून मला ही कल्पना सुचली आणि मी रोबोलाच लायनीत उभे केले. माझ्या अगोदर तेथे दोन जण लायनीत होतेच पैकी एक जण तर १७ दिवस घरी न जाता अॅपल स्टोअर्स समोर थांबला होता. रोबोला कुणी लायनीबाहेर काढू नये म्हणून ल्यूसी ईमेल आणि चॅट च्या माध्यमातून लायनीतील मागच्या लोकांना आपला नंबर रोबोने लावला असल्याचे सतत सांगत होती. लोकांनाही तिची कल्पना एकदमच आवडली आणि कुणीही रोबोला लायनीतून बाजूला केले नाही. अनेकांनी ल्यूसीची रोबोच्या माध्यमातून मुलाखत घेतली तर अनेकांनी रोबोसमवेत आपल्या सेल्फी काढून घेतल्या. ल्यूसीच्या आयफोनचे पॅकेज रोबाच्या गळ्यात अडकविण्यात आले होते.

Leave a Comment