रेनॉलटने लॉन्च केली क्विड

kwid
मुंबई : रेनॉलट इंडियाने गुरुवारी क्विड ही लहान कार लॉन्च केली असून या कारची दिल्लीच्या एक्स शो रुममध्ये किंमत २,५६,९६८ रुपये एवढी आहे. रेनॉलटच्या स्वस्त कारमुळे आता लहान कारमध्ये अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे.

क्विडच्या स्टॅंडर्ड कारची किंमत २.५६ लाख आणि टॉप मॉडेलची किंमत ३.५३ लाख रुपये आहे. तसेच याशिवाय कंपनीने कारच्या आणखी काही व्हरायटीज असणार असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या असणार आहेत.

क्विड कारची लांबी मारुती अल्टो ८०० आणि इऑन या कार पेक्षा थोडी मोठी आहे. क्विडची अंतर्गत रचना आरामदायी असल्यामुळे ही कार आपले लक्ष वेधते. या कारला ‘बेबी डस्टर’ असे नाव दिले गेले आहे. कारण ही कार दिसायला डस्टर कार सारखी दिसते. या क्विड कॉम्पॅक्ट कारचे वैशिष्ट्य म्हणजे प्रोफाइल एक नवीन आणि अद्वितीय आहे. रेनॉ क्विडचे इंजिन ८०० सीसी आहे. मारुती ऑल्टो आणि टाटाची नॅनो झेन एक्स या कारला जोरदार टक्कर देऊ शकते. पेट्रोल इंजिनला २५.१७ किलोमीटर प्रति लीटर क्विड कारचे मायलेज आहे.