७वा वेतन आयोग; २० टक्क्यांपर्यंत होऊ शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

pay-commission
नवी दिल्ली- केंद्राला ७ व्या वेतन आयोगाने शिफारशी सादर केल्या असून त्यावर ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय होईल. गरज भासल्यास काही बदलही शक्य आहेत. त्यानंतर या शिफारशी अर्थ मंत्रालयाकडे पाठवल्या जातील.

आयआरएस अधिकाऱ्यांना समान वेतन देण्याचा तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात २०% वाढीचाही प्रस्ताव आहे. हा अहवाल आयोगाचे अध्यक्ष अशोककुमार माथूर, सचिव मीना अग्रवाल आणि सदस्य डॉ. राथिन राय व विवेक राक यांनी तयार केला आहे. सध्या कर्मचाऱ्यांसाठी ३२ पे स्केल आहेत. भारत सरकारचे सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्यासाठीही वेगवेगळे पे स्केल आहेत. त्यात घट करून १२ करण्याचा प्रस्ताव आहे. आयएएस, आयपीएस व आयआरएसचे पे स्केल समान असेल. त्यामुळे आम्हाला आयएएसपेक्षा कमी वेतन मिळते, ही आयपीएस व आयआरएसची तक्रार राहणार नाही.

Leave a Comment