बेंटलीची बेंटेगा जगातील सर्वात महाग पण वेगवान एसयूव्ही

bentley
जगातील सर्वात बलाढ्य आणि महाग एसयूव्ही बेंटेगाचे फ्रँकफर्टमधील ऑटो शो मध्ये दर्शन घडले असून ही गाडी बेंटली या जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनीने यूकेमध्ये तयार केली आहे. भारतात या गाडीची किंमत अंदाजे ७ कोटी रूपये असेल असे सांगितले जात आहे. २०१६ पासून या गाडीची डिलिव्हरी दिली जाणार आहे.

ही गाडी महाग आहे हे खरेच पण जो कोणी तिचा मालक असेल त्याची शानही कितीतरी पटीने वाढणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या गाडीला डब्ल्यू १२ इंजिन दिेले गेले आहे. १२ सिलींडरवाले जगातले हे सर्वात अत्याधुनिक इंजिन समजले जाते. ० ते १०० चा वेग पकडण्यास या गाडीला ४ सेकंद लागतात आणि तिचा टॉप स्पीड आहे ३०० किमी. त्यामुळे ही जगातील सर्वात वेगवान एसयूव्ही आहे. या गाडीसाठी ३ प्रकारची चाके आहेत.२०.२१,२२ इंची साईजच्या या चाकामधून ग्राहक निवड करू शकणार आहे.

गाडीचे डिझाईन करताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर पूर्ण आराम आणि सुरक्षा मिळेल याची काळजी घेतली गेली आहे. यातील इलेक्ट्रोनिक नाईट व्हीजन ही इनोव्हेटिव फिचर्सपैकी एक आहे. या तंत्रज्ञानामुळे समोर आलेल्या वस्तू इन्फ्रारेड तंत्रज्ञानाने ओळखल्या जातात. गाडीत ८ इंची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम दिली गेली असून त्यामुळे नेव्हीगेशनलाही मोठी मदत मिळते. मागच्या सीटसाठीही इंफोटेनमेंट स्क्रीन दिला गेला आहे. रंग आणि लेदरसाठी अनेक पर्याय ग्राहकाला उपलब्ध आहेत. ज्या रंगाचे लेदर ग्राहक पसंत करेल त्याला मॅचिंग अंतर्गत सजावटीचा रंग दिला जाणार आहे. यात बेंटेगा ब्रॉन्झ हा नवीन रंगही उपलब्ध करून दिला असून हा रंग केवळ याच एसयूव्हीसाठी तयार केला गेला आहे.

Leave a Comment