पेप्सीच्या इंद्रा नूयींना ग्लोबल लिडरशीप पुरस्कार

indra
पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नूयी यांना यूएस इंडिया बिझिनेस कौन्सिलचा २०१५ चा ग्लोबल लिडरशीप पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार त्यांना सोमवारी प्रदान करण्यात आला. उद्योग जगातातील त्यांचे योगदान आणि महिला सबलीकरणातील सहभाग यासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे. एचटी ग्रुपच्या अध्यक्ष शोभना भरतिया यांनाही नूयी यांच्याबरोबरच हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला अमेरिकेचे उपराष्ट्रपती जो बिडेन, परराष्टमंत्री जॉन केरी उपस्थित होते.

इंद्रा नूयी या संदर्भात म्हणाल्या की इंडो अमेरिकन बिझिनेस कौन्सिल भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्परसंबंध अधिक मजबूत बनविण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. ही संस्था भारत व अमेरिकी कंपन्यांसाठी ४० वर्षांपूर्वी स्थापली गेली असून ती मुख्य अॅडव्होकसी ग्रुप म्हणून काम करते.

Leave a Comment