ऑनलाईन शॉपिंगवर यंदाच्या दिवाळीला डिस्काऊंट नाही!

e-commerce
मुंबई: यंदाच्या दिवाळीत तुम्ही मोठ्या डिस्काऊंटच्या अपेक्षेने ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर विविध साहित्य खरेदीच्या विचारात असाल तर यावेळी तुमची घोर निराशा होणार आहे. कारण यंदा कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर मोठे डिस्काऊंट मिळणार नाहीत.

कंपन्यांना हा निर्णय आतापर्यंतचा उत्सव काळातील घटता नफा पाहता घ्यावा लागला आहे. सुरुवातीला मार्केट शेअर आणि ट्रॅफिक मिळवण्यासाठी ई-कॉमर्स साईट्स विविध उत्पादनावर भरघोस डिस्काऊंट देत होते. डिस्काऊंटमुळे उत्पादनांच्या विक्रीत भलेही वाढ होते, परंतु यामुळे कंपनीला फारसा फायदा होत नाही.

सोनी, अॅपल, सॅमसंगच्या उत्पादनांनवर भरघोस सवलती देऊन या वस्तू देशातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्या अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील या साईट्स विकत होत्या. मात्र यंदा त्यांनीही सवलत न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनला ऑनलाईन शॉपिंग करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना डिस्काऊंटशिवाय खरेदी करावी लागणार आहे.

Leave a Comment