फोक्सवॅगनला अमेरिकेने ठोठावला ११५० अब्ज डॉलरचा दंड

volkswagon
न्यूयॉर्क – जगातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगन कंपनीला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. अमेरिकन पर्यावरण संरक्षण संस्थेने फोक्सवॅगन कंपनीला पर्यावरणाला हानी पोहोचविल्या प्रकरणी अब्जावधी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. भारतीय चलनात या दंडाची रक्कम तब्बल साडे अकरा अब्ज रुपये आहे.

फोक्सवॅगनने अमेरिकन पर्यावरण संरक्षण संस्थेने केलेल्या तपासणीत दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. फोक्सवॅगनने लबाडी करून एका सॉफ्टवेअरच्या आधारे टेस्टिंगमध्ये प्रदूषणाची मात्रा कमी दर्शवली होती. प्रत्यक्षात मात्र या गाड्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनीला अमेरिकेतील आपल्या पाच लाख कार परत बोलवाव्या लागणार आहेत.

झेटा, बीटल, पसाट, गोल्फ आणि ऑडी ए3 सारख्या गाड्यांमध्येही असले सॉफ्टवेअर वापरण्यात आले होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर कोरिया आणि अन्य देशांनीही फोक्सवॅगन कार गाड्यांची तपासणी सुरु केली आहे. यामुळे जगभरातील जवळपास एक कोटी दहा लाख गाड्यांना याचा फटका बसणार आहे. गेल्या सात वर्षांत या सर्व वाहनांची निर्मिती झाली होती.

फोक्सवॅगनने फसवणूक केल्याचे कबूल केल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास २० टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचा परिणामही युरोप आणि आशियातील शेअर बाजारांवर झाला आहे.

Leave a Comment