अब्जाधीश शिविंदर सिंह सोडणार संपतीवर पाणी

shivinder-singh
नवी दिल्ली : फोर्टिस हेल्थकेअरचे सह संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष शिविंदर मोहन सिंह यांनी कंपनीच्या पदाचा राजीनामा देऊन अध्यात्मिक संस्था राधा स्वामी सत्संग ब्यासशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला असून मागील अनेक वर्षांपासून सिंह यांचे कुटुंब राधा स्वामी सत्संगचे अनुयायी आहे.

शिविंदर मोहन सिंह हे आता यापुढील आयुष्य सेवेसाठी समर्पित करणार आहेत. पण रंजक गोष्ट म्हणजे संचालक बोर्डात त्यांची जागा कायम राहिल, शिवाय ते होल्डिंग कंपन्यांचाही भाग असतील.

आज झालेल्या फोर्टिस हेल्थकेअरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये याबाबतची घोषणा केली आहे. शिविंदर आणि त्यांचे मोठे बंधु मलविंदर मोहन सिंह यांचे कंपनीत सुमारे ७१ टक्के शेअर्स आहेत. फोर्टिस हेल्थकेअरमध्ये सिंह कुटंबाच्या सध्याच्या स्टेकची किंमत ५६३६ कोटी रुपये आहे. तर रेलिगेअर एन्टरप्रायझेसमधील त्यांच्या शेअर्सची किंमत २६९३ कोटी रुपये आहे.

ड्यूक युनिव्हर्सिटीमधून हेल्थकेअरमध्ये एमबीएची पदवी शिविंदर यांनी घेतली होती. यानंतर त्यांनी या व्यवसायात प्रवेश केला. मॅथमॅटिक्समध्ये मास्टर्स डिग्री असल्याने शिविंदर मोहन सिंह आंकड्यांमधील तज्ज्ञ आहेत. रुग्णालयाशिवाय शिविंदर मोहन सिंह हे बंधु रेलिगेअर एन्टरप्रायझेसही संलग्न आहेत. त्याचबरोबर एसआरएल लॅबोरेटरीज नावाने त्यांचे डायग्नोस्टिक्सचा व्यवसाय आहे. एवढेच नव्हे तर या ग्रुपजवळ दोन प्रमुख आयटी कंपन्यांही आहेत.

Leave a Comment