सेल्फी वेड्यांसाठी आला सेल्फी स्पून

spoon
सेल्फी वेड्यांना तरतर्‍हेचे पदार्थ हादडतानाचे सेल्फी अगदी सहज आणि स्पष्ट काढण्यासाठी बाजारात सेल्फी स्पून आले आहेत. सेल्फी स्टीक, सेल्फी स्टँड नंतर या सेल्फी स्पूनच्या आगमनाने सेल्फी वेडे नक्कीच खूष होतील.

मिळालेल्या माहितीनुसार वास्तवात ही सेल्फी स्टीकच आहे. मात्र त्याला ३० इंचांपर्यंत लांबविता येईल असा रॉड दिला गेला आहे आणि त्याच्या टोकाला चमचा बसविला गेला आहे. जनरल मिल्स ब्रॅण्ड सिनेमन टोस्ट क्रंच ने हा सेल्फी स्पून आणला असून त्यामुळे हातात हा चमचा धरून खात असताना खाताखाताच सेल्फी काढून तो फोटो शेअर करणे सोपे जाणार आहे. युजरला त्यासाठी फोनवर ब्ल्यूटूथ ऑन करावे लागेल. स्पूनला दोन बटणे दिली गेली आहेत. एक अँड्राईड फोनवर फोटो घेते तर दुसरे आयओएस फोनवर फोटो घेते.

Leave a Comment