मार्शमेलो ६.० सह येणार वावेचा १२८ जीबी नेक्सस ६ पी

nexus
स्मार्टफोनवरील फिचर्सची संख्या वाढत चालली असल्याने आता १६ जीबीची मेमरी पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. ही अडचण गुगलने अचूक हेरली असून त्यासाठी जास्त इंटरनल मेमरी असलेला स्मार्टफोन गरजेचा ठरल्याचेही ओळखले आहे. अँड्राईड पोलिस या मासिकातील बातमीनुसार स्मार्टफोन कंपनी हुवाई त्यांचा वावे नेक्सस ६ पी हा नवा स्मार्टफोन १२८ जीबी स्टोरेजमध्ये सादर करत आहे. वावेचे नेक्सस ३२ व ६४ जीबी स्मार्टफोन यापूर्वीच बाजारात उपलब्ध करून दिले गेले आहेत.

अॅड्राईड पोलिसमधील बातमी खरी असेल तर वावे नेक्सस गुगल डेव्हलपरचा इतक्या प्रचंड क्षमतेचा पहिला गुगल डिव्हाईस बनेल. गतवर्षीच वावेचे नेक्सस सिरीजमधील ३२ व ६४ जीबीचे फोन बाजारात आले आहेत. मात्र वावे नेक्सस ६ पी अँड्राईडच्या नव्या मार्शमेलो ६.० सह असेल. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८१० आक्टाकोर चिपसेट, ३ जीबी रॅम, ५.७ इंची डिस्प्ले असेल.

त्याचबरोबर एलजी नेक्ट फाईव्ह एक्स हा फोनही ३२ व ६४ जीबी मेमरीसह बाजारात आणला जात असून हे दोन्ही फोन गुगलच्या २९ आक्टोबरला होत असलेल्या इव्हेंटमध्ये सादर केले जातील असेही समजते.

Leave a Comment