भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिकेत दिले ४ लाखांवर रोजगार

itcompamy
भारतीय आय टी कंपन्यांनी देशात रोजगार निर्माण करण्यात मोठा हातभार लावला आहेच पण त्याचबरोबर अमेरिकेतही रोजगार निर्माण करण्याचे मोठे काम केले असल्याचा अहवाल नुकताच सादर झाला आहे. या अहवालानुसार अमेरिकेत केल्या चार वर्षात आयटी कंपन्यांनी ४ लाख ११ हजारांहून अधिक लोकांना काम दिले आहे तसेच याच काळात २० अब्ज डॉलर्सचे कर उत्पन्नही अमेरिकेला मिळवून दिले आहे.

नॅसकॉमच्या अहवालानुसार २०११ ते २०१५ या काळात अमेरिकी राजकोषात ३७.५ कोटी डॉलर्सची भर भारतीय कंपन्यांमुळे पडली आहे. त्याचा वापर अमेरिकी सीमा सुरक्षित करण्यासाठी केला गेला आहे. वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की भारतीय प्रतिभेचा वापर अमेरिकी कंपन्यांना अधिक चांगली आणि सफल कामगिरी बजावण्यासाठी उपयुक्त ठरला आहे तसेच त्यामुळे जागतिक बाजारात त्यांची भागीदारी वाढण्यासही हातभार लागला आहे.

Leave a Comment