आता भारतात गूगलचे ऑनलाईन आयटी कोर्स

google
मुंबई : भारतात ऑनलाईन आयटी कोर्स जाईट सर्च इंजिन गूगलने सुरु केला असून मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आणि अँड्रॉईड अॅप तयार करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर विकसित करण्याची तांत्रिक माहिती या अंतर्गत गूगलकडून शिकवली जाणार आहे.

गूगलचे शिक्षक अमेरिकेमधून हा ऑनलाईन कोर्स शिकवणार असून सहा आणि नऊ महिन्यांमध्ये पूर्ण होणाऱ्या या महत्त्वपूर्ण कोर्ससाठी तुम्हाला ९ हजार ८०० रुपये प्रवेश फी मोजावी लागणार आहे. मात्र कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या प्रवेश फी पैकी अर्धी रक्कम परत दिली जाणार आहे. याशिवाय गूगल आणि टाटा ट्रस्टने उडासिटीसोबत मिळून आणखी एक कार्यक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून डेव्हलपर्सना १ हजार अँड्रॉईड नॅनोडिग्री स्कॉलरशिप दिली जाणार आहे. स्कॉलरशिपसाठी अर्ज आता मागवण्याची शक्यता आहे. याबाबत गूगलने दिलेल्या माहितीनुसार, ३० लाख सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससोबत भारत जगातील दुसऱ्या क्रमाकाचे अॅप डेव्हलपर देश आहे आणि पहिल्या क्रमांकावर येण्याची भारतीय युवकांमध्ये क्षमता आहे.

Leave a Comment