एअर इंडिया सुरू करणार दीर्घ अंतराची थेट फ्लाईट

air-india
एअर इंडिया जगातील सर्वाधिक दीर्घ अंतर कापणारी थेट विमानसेवा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे समजते. १४ हजार किमी अंतर कापणारी ही सेवा बंगलोर ते सॅन फ्रान्सिस्को या अंतरावर असेल असेही सांगितले जात आहे. यापूर्वीचे दीर्घ अंतराचे रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या कॉन्टस एअरलाईन्सच्या नावावर असून त्यांची अमेरिकेतील डेलस फोर्टवर्थ ते सिडने ही फ्लाईट १३७३० किमी अंतर कापते.

पुढच्या वर्षात यूएईची एअर एमिरेटसची दुबई पनामा सिटी ही दीर्घ अंतराची फ्लाईट सुरू होत असून हे अंतर १३७३० किमी आहे. मात्र इराक सिरीया वगळून ही फ्लाईट न्यावी लागणार असल्याने हे अंतर वाढले आहे. एअर इंडियाच्या अधिकारी वर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी बोईंग ७७७-२०० विमान लाँग रेंजसाठी वापरेल आणि दिल्ली वा बंगलोर पासून ही फ्लाईट उड्डाण करेल. ही फ्लाईट सुरू झाली तर एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नव्यानेच आलेल्या अश्विनी लोहाना यांचा हा पहिलाच मोठा निर्णय ठरणार आहे.

अंतर्गत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिलीकॉन व्हॅलीत मोदींचा २७ सप्टेंबरला जो कार्यक्रम होत आहे, त्यावेळीच या फ्लाईट संदर्भातली घोषणा होऊ शकेल. या भागात भारतीय वंशांच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

Leave a Comment