अॅपलच्या नव्या आयफोनसाठी सध्यातरी वेट अँड वॉच

iphone
क्युपरटिनो- जगभरातील १२ देशांमध्ये आयफोन ६ २५ सप्टेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे परंतु त्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही. २५ सप्टेंबरपासून आयफोन ६ आशियातील चीन, जपान, हाँग काँग या देशांमध्ये उपलब्ध राहील.

भारतामध्ये आयफोनची म्हणावी तशी मागणी नसल्यामुळे अॅपल आयफोन ६ भारतात उपलब्ध राहणार नाही. आयफोन ४एस हा सर्वात जास्त विकला गेलेला फोन आहे. भारतातील ग्राहक त्यांचा फोन अपग्रेड करण्यासाठी अजून तयार नाही असे गार्टनर इंडियाचे रिसर्च प्रमुख विशाल त्रिपाठी यांनी म्हटले. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत अॅपलसाठी खूप पैसे मोजावे लागत असल्यामुळेच भारतीय ग्राहकांमध्ये आयफोनबदद्ल उत्सुकता नाही. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी आणि न्यूझीलंड या देशांमध्ये आयफोन ६ एस २५ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment