आरबीआय पतधोरण निश्चितीबाबत जबाबदारपणे वागेल- जेटली

jaitley
हाँगकाँग – आरबीआयचे पतधोरण २९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आरबीआय जबाबदारपणे व्याजदरांबाबत भूमिका घेईल असा आशावाद व्यक्त केला.

जर देशाची अर्थव्यवस्था वाढायला पाहिजे असे वाटत असेल आणि देशी उत्पादनांची मागणी वाढायला हवी असे वाटत असेल तर आरबीआयने व्याजदर कमी करणे आवश्यक आहे असे मला वाटते. ही गरज लक्षात घेऊन आरबीआय पावले उचलेल असे जेटली म्हणाले. सरकारने पतधोरणाबाबत निश्चित ध्येय ठरवलेले आहे. त्या गोष्टीची आरबीआय दखल घेईल अशी आशा जेटलींनी व्यक्त केली. व्याजदर अधिक असण्याचा फटका रिअल इस्टेट क्षेत्राला बसला. जर व्याजदरात कपात झाली तर त्याचा फायदा या क्षेत्राला होईल आणि भरभराटही होईल असे जेटली म्हणाले.

Leave a Comment