आता खाद्यतेल महागले

oil
नवी दिल्ली : खाण्याचे तेल आणि खाण्याच्या कच्च्या तेलावरील आयात करात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आधी ७.५ टक्के असलेला कच्च्या तेलावरचा हा कर वाढवून १२.५ टक्के करण्यात आला आहे. रिफाईन्ड तेलावरील करातही वाढ करण्यात आली असून तो आता पूर्वीच्या १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात आला आहे. यामुळे डाळीनंतर खाद्यतेलही महागणार आहे. या निर्णयानंतर तेलाची आयात महाग झाली असून, देशांतर्गत तेल उद्योगाला चालना मिळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. उद्योग जगताकडून हा कर २५ टक्के करण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या दीड-दोन वर्षात कच्च्या तेलाच्या आयातीच्या किमतीत ३५ टक्क्यांपर्यंत, तर रिफाईन्ड तेलाच्या किमतीत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे, तेलाची आयात करणे तुलनेने स्वस्त झाले आहे. मात्र, याचा विपरित परिणाम देशांतर्गत तेल उद्योगावर पडत होता.

Leave a Comment