नवी दिल्ली – भारताचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) सर्वांत नीचांकी वेतन देण्यात जगात सातवा क्रमांक लागतो. एका अहवालामधून भारतामधील आयटी कंपन्या जगभरातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूप कमी वेतन देत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आयटी’ क्षेत्राची भारतामधील उलाढाल सुमारे ११८ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी असून त्यामध्ये ३१ लाख कर्मचारी काम करत आहेत.
भारतात आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळते नीचांकी वेतन
जगभरातील आयटी कंपन्यांचे माय हायरिंग क्लब डॉट कॉम या संस्थेने सर्वेक्षण केले. भारतामधील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवस्थापकाला सरासरी ४१ हजार २१३ डॉलर्स इतके वेतन दिले जाते. या तुलनेत स्वित्झर्लंडमधील त्याच दर्जाच्या अधिका-याला चौपटीपेक्षा जास्त वेतन दिले जात असल्याचे या सर्वेक्षणामधून उघड झाले आहे.
स्वित्झर्लंडमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सर्वाधिक वेतन देतात. या देशातील आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांना सरासरी एक लाख ७१ हजार ४६५ डॉलर्स इतके वेतन आहे. तर तेच सर्वाधिक वेतन देण्यात दुस-या स्थानी असलेल्या बेल्जियममध्ये ५२ हजार ४३० डॉलर्स इतके वेतन दिले जाते. डेन्मार्कचा तिसरा (३८,९२० डॉलर्स) तर युनायटेड स्टेट्स (३२,८७७ डॉलर्स) आणि युनायटेड किंगडमचा (२९,३२४ डॉलर्स) अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो.
या यादीमध्ये बल्गेरिया (२५,६८० डॉलर्स), व्हिएतनाम (३०,९३८ डॉलर्स) , थायलंड (३४, ४२३ डॉलर्स), इंडोनेशिया (३४, ७८० डॉलर्स), फिलिपाईन्स (३७, ५३४ डॉलर्स), चीन (४२, ६८९ डॉलर्स), झेक प्रजासत्ताक (४३, २१९ डॉलर्स) आणि अर्जेंटिनात (५१, ३८० डॉलर्स) इतके वेतन देत असल्याचे म्हटले आहे.